Dyandeep Academy

About Us

श्री. महेश शिंदे
(संचालक)

ज्ञानदीप अकॅडमी,पुणे

For UPSC & MPSC

शिक्षण :-

B.Sc. Agriculture,MA Economics,LLB

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ म्हणजेच ज्ञानदीप अकॅडमी

Strong will along with dedicated smart efforts, not circumstances, determines your success. एप्रिल २०१३ मध्ये ‘विद्यार्थ्यांनी चालविलेली चळवळ’ या स्वरूपात सुरू केलेली ज्ञानदीप ॲकॅडमी आता राज्यभराच्या विद्यार्थ्यांनी बहरलेली पाहताना थोडेसे समाधान वाटण्यासोबतच प्रचंड जबाबदारीची जाणीव मला आहे. स्पर्धा परीक्षेकडे येताना विद्यार्थी ज्या एनर्जीने आणि पॅशनने येतो, तीच एनर्जी आणि पॅशन यश मिळेपर्यंत (वा संधी संपेपर्यंत) टिकवून ठेवणे अवघड असते. त्यासाठी आवश्यक असणारे सर्वांकडे नसते. विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची चळवळ म्हणून ॲकॅडमी सुरू करताना या गोष्टी माझ्या डोळयांसमोर होत्या.
क्लास लावून पोस्ट काढता येते या विधानाशी मी केव्हाच सहमत नव्हतो, आजही नाही. विद्यार्थी उत्तीर्ण होतात ते खरे तर त्यांच्या स्वतःच्या प्रामाण्कि प्रयत्नांमुळेच असा माझा विश्वास आहे. या विश्वासाचाच परिणम म्हणून ‘आमच्या ॲकॅडमीतून इतक्या—इतक्या उमेदवारांची निवड’ अशी जाहिरात न करण्याची आणि यशस्वी विद्यार्थ्यांची नावे वा फोटो जाहिरातीसाठी न वापरण्याची व्यावसायिक नीतीमत्ता ज्ञानदीप ॲकॅडमीने पाळलेली आहे.
स्पर्धा परीक्षा ही पर्सनॅलिटीची परीक्षा आहे असे खूप लोक म्हणतात. माझे याबाबत थोडे वेगळे मत आहे Rather than personality, it is an exam of pragmatism, practically, practice, temperament, smart work, hard work and then small percentage of your personality which is obviously an outcome of these things.
ब्रिटिशांचे राज्य जाऊन पाऊण शतक होत आले तरी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची क्रेझ अजिबात कमी झालेली नाही. आपल्या करिअरमधील अत्यंत निर्णायक अवस्थेत, अनेकांना पुरेसे आर्थिक पाठबळ नसताना सळसळत्या रक्ताची तरूणाई देशाच्या परिस्थितीत मूलगामी बदल घडविण्यासाठी, अधिकारी होण्यासाठी जीवापाड मेहनत घेते आणि अशा ऊर्जावान तरूणाईला योग्य मार्ग दाखविण्याची मोठया भावाच्या वा वडिलकीच्या नात्याने आपली जबाबदारी या जाणिवेतून आणि भूमिकेतून वाटचाल करीत ज्ञानदीप ॲकॅडमीने मार्ग—दर्शनाची कास धरलेली आहे.
नेमून दिलेल्या अभ्यासक्रम स्पर्धापरिक्षांना असला तरी Year by Year प्रश्नांच्या Pattern मध्ये प्रचंड Variation येत राहते. त्यामुळे प्रचंड तयारी केलेली असली तरी Temperament ही चीच कसोटी बनते. त्यामुळे Dynamic Situations नुसार ज्ञानदीप ॲकॅडमीत आम्ही प्रत्येक कोर्सला, प्रत्येक मॉड्यूलला Scientifically Design करण्याचा प्रयत्न करतो. तरूणाईच्याच भाषेत व Context मध्ये Feedback मिळावा म्हणून स्पर्धापरीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि नुकतेच उत्तीर्ण झालेले उमेदवार यांच्यामार्फत मार्गदर्शन आणि थेट संवादाची संधी उपलब्ध करून देण्यावर आम्ही जोर दिलेला आहे? दर्जेदार पण विद्याथ्र्यांना सहज समजावून घेता येईल अषा भाषेतील अभ्यासासाठीची पुस्तके (संदर्भाची वा संषोधनाची नव्हे) उपलब्ध करवून देणे, तीही माफक किंमतीत हा ज्ञानदीप विद्यार्थी चळवळीचा अत्यंत महत्वाचा पैलू आहे. आजवर अषी साठवून अधिक उपयुक्त पुस्तके ज्ञानदीप परिवाराने चळवळया होतकरू लेखकांच्या सहकार्याने बाजारात आणलेली आहेत आणि विद्याथ्र्यांच्या प्रतिसादाने हा आकडा वाढतच जाणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मानाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग काहीसा अनियमित असला तरी त्यामुळे उमेदवारांच्या मनोधैर्यावर अजिबात परिणाम होताना दिसत नाही. उलट या अनियमिततेतून त्यांचा निष्चय आणखीच बळकट होत असावा असे मला वाटते ! या परीक्षांकडे फक्त स्वप्न inspiration, पदेचपतंजपवद म्हणून पाहू नका, उघड्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पहा. आपली कुवत (आर्थिक व बौध्दिक), सध्याची प्राथमिकता आणि सोबतच आपले स्वप्न या सगळ्यांचा ताळमेळ घालून निर्णय घ्या.
निर्णय घेताना वेळ लागला तरी हरकत नाही. एक खूप महत्त्वाचे वाक्य आहे If you fail to plan, you plan to fail पण एकदा निर्णय झाल्यानंतर मागे वळून पाहू नका. आपले तन-मन-धन सगळे काही झोकून द्या. बदलत्या काळानुसार आपल्या पुस्तकांमध्ये, Reference Material मध्ये, ] Reading मध्ये, Notes-making मध्ये तुम्ही बदल करणे अपेक्षित आहे आणि या सगळया बदलांना तुम्हाला मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘ज्ञानदीप अॅकॅडमी’ सदैव तत्पर असेल. एक लक्षात ठेवा…..

पराभवाने माणूस संपत नाही
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो
म्हणून
‘‘चला उभरा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला,
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला.’’

श्री. महेश राजाराम शिंदे
संचालक,
ज्ञानदीप अकॅडमी, पुणे.

Vision

Lorem ipsum dolor sit, consectetur incididunt ut labore et dolore magna aliqua ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco.

mission

Lorem ipsum dolor sit, consectetur incididunt ut labore et dolore magna aliqua ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco.

Academy infra photo

Academy library , classroom pics